काही कल्पना डोक्यात हळूच येतात, आणि त्या एका नव्या दालनाच्या किल्लीचं काम करतात. आम्ही सुरू करत आहोत त्या वाचनालयाची कल्पना अशीच अचानक आली, नि लगेच लक्षात आलं की ही एका नव्या वाटेचं
दार उघडू पाहणारी किल्ली आहे. म्हणूनच आपल्या वाचनालयाचं नाव आहे - आलोहमोरा!

मुलांच्या प्रिय 'हॅरी पॉटरच्या जादुई जगात' या मंत्राचा अर्थ आहे —उघड! कोणतंही कुलूप उघडण्याचा हा मंत्र आहे. हे वाचनालय मुलांमधल्या कुतूहलाला, कल्पनांना, आणि पुस्तकांच्या जगात हरवून जाण्याच्या आनंदाला वाट उघडी करून देणारं असेल. पुस्तकांमध्ये अमर्याद शक्यता दडलेल्या असतात, हे वाचनालय त्या सगळ्या शक्यतांचं दार मुलांसाठी उघडेल. वाचन केवळ आनंदासाठीच नाही, तर चांगल्या शिक्षणासाठीही आवश्यक कौशल्य आहे. आलोहमोरा या कौशल्यावरही लक्ष केंद्रित करणारी असेल.
वाचनालयाची वेळ
मंगळवार ते शुक्रवार : संध्याकाळी 4 ते 7:30
शनिवार : दुपारी 2 ते 7:30
रविवार : सकाळी 10 ते 4
**यापैकी मंगळवार आणि बुधवार परिसरातल्या अल्प उत्पन्न गटातल्या मुलांच्या वापरासाठी राखीव दिवस. या दिवशी पुस्तकांची देवघेव बंद राहील
सोमवार सुट्टी
कुणासाठी?
लहानगट (Jr. kg.) ते दहावीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
शुल्क
| नोंदणीचा प्रकार | यात काय येणार | 3 महिन्याचे | 6 महिन्याचे | 12 महिन्यांचे |
सब्स्क्रिप्शन - 1 पुस्तक (पूर्वनोंदणी उपलब्ध नाही. नियमित नोंदणी 1 जूनपासून सुरू) |
| रु. 1200
| रु. 2200
| रु. 4200
|
सब्स्क्रिप्शन - 3 पुस्तक (पहिल्या 100 जणांना सवलतीचे दर कंसात) |
|
रु.1650
|
रु. 3100 (रु. 2700) |
रु. 6000 (रु. 5000) |
वाचनालय कसे आहे?
डिस्कव्हरिंग झीरो फाऊंडेशन तर्फे अक्षरनंदन शाळेच्या सहकार्याने सुरू झालेल्या 'आलोहमोरा' या नव्या वाचनालयाची माहिती इथे दिली आहे. माहिती वाचून शेवटी दिलेली लिंक वापरून सवलतीत पूर्वनोंदणी करता येईल.
भौतिक स्वरूप :
- शक्य तितकी मोकळी, प्रसन्न जागा.
- मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकं तर असतीलच. त्याचबरोबर इतरही भाषांतली पुस्तकं असतील. शब्दरहित पुस्तकं असतील.
- 3 ते 14 वयोगटातील मुलांच्या दृष्टीने पुस्तकं असतील.
- काही पुस्तकं वाचनालयात बसून वाचण्यासाठी असतील, तर काही घरी नेण्यासाठी.
- बंद कपाटांऐवजी खुली रचना असेल. इथे मुलं सहज फिरू शकतील, पुस्तकांना स्पर्श करून पुस्तकांची निवड करू शकतील. त्यासाठी आवश्यक ते खुलं वातावरण, त्यानाण पुस्तकांशी जोडू पाहणारे उपक्रम आणि पुस्तकांबद्दल प्रेम करणारी लोकं आजूबाजूला असतील.
- बसण्यासाठी विविध कोपरे — गादी, चटई, पायऱ्या इत्यादी - असतील.
- पुस्तकांसोबत चित्रं, खेळ, वस्तू आणि डिस्प्ले असतील. मुलांच्या कामाची मांडणी केलेली असेल.
- भौतिक रूप बदलत राहणारी ही जागा असेल. विषयानुसार मांडणी आणि प्रदर्शनं सतत बदलत राहतील. मुलांना दर काही दिवसांनी इथे काहीतरी नवीन सापडेल.
- मुलांना भेटायला वेळोवेळी वेगवेगळे पाहुणे येतील.
पूर्वनोंदणी करण्यासाठी इथे दिलेला फॉर्म भरावा ही विनंती





