सुट्टीतील धमाल १२: जादूचे प्रयोग! (व्हिडीओ)

सुट्टीतील धमाल १२:
जादूचे प्रयोग! (व्हिडीओ)
कलाकारः वर्णिका राघवेंद्र कुलकर्णी(इयत्ता ३री, द ऑर्किड स्कूल)

आज आपण जादूचे प्रयोग बघणार आहोत. वर्णिका ही आपली मैत्रीण जादूगार झाली आहे बरं.
या सुट्टीत ती हे नवे जादूचे प्रयोग करायला शिकली आहे. चला बघुया:

तुम्हाला ही जादू आवडली असेल तर जादूचा एक प्रयोग काव्या या आपल्या दुसरीतील मैत्रीणीनेही केला होता. तो इथे बघता येईल.

==============================

'सुट्टीतील धमाल'बद्द्ल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली असेल ना किंवा करोनाची साथ असल्याने शहाण्यासारखे तुम्ही घरातच बसून असाल. मग तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा तुमच्यासोबत करोनामुळे घरातच असणाऱ्या आईबाबा किंवा आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल!या सदरात येणारं लेखन हे सुट्टीत मुलांनी घरी बसण्यास प्रोत्साहन म्हणून जसंच्या तसं प्रकाशित केलं जाईल. अर्थात यावर कोणत्याही प्रकारचं संपादन केलेलं नसेल. जे काय कराल ते मात्र घरातच करता येण्याजोगे हवे. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com