आकार (कविता)

आकार
कवी: दिप्ती दखणे
चित्र: वैभवी शिधये
का मुलाला समजेनात आकार
चौकोनी आहे चेंडू म्हणे
गोल आहे कार
कोपरे कोनांचा असे मोठा गोंधळ
षट्कोनी पुऱ्या खाई
मुलगा फारच चोखंदळ
आयत कोंबड़ीचे अंडे म्हणायचा
पाच बोटांच्या पंचकोनाला
तो अंडाकृती ओळखायचा
खीर आवडीने चाटुन पुसून खाई
त्रिकोणी असे वाटी त्याची
त्याचे खूप लाड करायची आई