प्रतिबिंब (कविता)
प्रतिबिंब
कवयित्री आणि चित्र: अनन्या अर्चना शिवानंद,
इयत्ता आठवी, आनंद निकेतन शाळा, नाशिक
गच्चीवरच्या कुंडीत मला एक छोटं रोपटं दिसलं
हिरमुसलेलं, ते एकटं होतं.
कुणी फूल नाही व पानंही अगदी मोजकीच.
पाणी देऊन पाहिलं पण
तरी काही हसे ना,
उन्हात सरकवून पाहिलं पण
तरी ते खुलेना.
रात्र उलटली, दिवस उजाडला
मग अचानक पाऊस पडू लागला.
कुंडीच्या भोवती पाण्याचे डबके वाहत आले
त्यात छोट्या रोपट्याचे प्रतिबिंब निर्माण झाले
आपला मित्र आला असे समजून
छोटे रोपटे पुन्हा डोलू लागले!
--oo--
ही कविता कवयित्रीला वयम मासिकात प्रकाशित झालेल्या पुढील बक्षीसपात्र छायाचित्रावरून स्फुरली.
छायाचित्रकार: मुग्धा क्षीरसागर