पुलवामातील हल्ला (कविता)

 

पुलवामातील हल्ला
-नील अ. म., अक्षरनंदन, सहावी

 

संपादकीय टिपण:
देशांत घडणाऱ्या घटना आणि वृत्तपत्र ही 'मोठ्यांसाठी'च्या बातम्यांनी भरलेली असली तरी त्या घटनांचा लहानांवर परिणाम होत असतोच. त्यांनाही काही मतं असतात आणि त्याबद्दल सकस चर्चाही संभवते.

नुकत्याच झालेल्या पुलवामा येथील भ्याड आतंकवादी हल्ल्याबद्दल अनेकांची अनेक मते आपण वाचली असली तरी लहानग्यांवर त्याचा झालेला परिणाम फारसा चर्चेत नाही. आपले लहानगेही याच समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यांनाही अशा घटनांनी खूप वाईट वाटते, राग येतो. 'नील अ. म.' या अक्षर नंदन शाळेत सहावीत शिकणाऱ्या मुलाने या विषयावर त्याची प्रतिक्रिया एका उत्स्फुर्त कवितेत व्यक्त केलीय. अनेक शाळांतून मुलांनी आपल्या भावना चित्रातूनही व्यक्त केल्या आहेत. इथे असणारे चित्रही त्याच वर्गातील 'रेवा क्षेमकल्याणी' हिने चितारले आहे.

मुलांच्या या भावनांना एक मंच मिळावा आणि त्यांच्याही वेदना, भावना पोहोचाव्यात म्हणून ही कविता आणि चित्र प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून देत आहोत.
तुमच्या वर्गात/मित्रांमध्ये कोणी असं व्यक्त झालं असेल तर आम्हाला आमच्या ईमेल पत्त्यावर (monitor.atakmatak@gmail.com) नक्की कळवा.