बारावीची परिक्षा मराठी माध्यमातून देण्याची सोय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. खरं तर ही सवलत यापूर्वीही करून देण्यात आली होती परंतू, त्याबाबत सध्या पुण्याची समर्थ मराठी संस्था व मराठी दैनिक लोकसत्ता अधिक माहिती उपलब्ध करून देत आहे. मराठी माध्यमातून बारावीची परिक्षा देण्यासाठी सध्या काही संस्थाही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहेत. या संस्थांचे कार्य निश्चितच चांगले आहे. परंतु, भाषाप्रेमापोटी आपण आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. » Read More