सुट्टीतील धमाल ११: हत्ती आणि मुंगी (कविता)

सुट्टीतील धमाल ११:

हत्ती आणि मुंगी

लेखनः मीरा सातवअक्षरनंदन, इयत्ता २री 
चित्रः अनय क्षीरसागर, भारतीय विद्या भवन, इयत्ता २री

------------------------------------------ 

एक होता हत्ती
एक होती मुंगी

दोघे गेले हॉटेलात
दाबून खाल्ला मटारभात

त्यानंतर गंमत म्हणून
दोन पानं टाकली खाऊन

मुंगीला तर काही सुधरेचना
हत्तीला तर काही सावरेचना

कसेबसे दोघे घरी गेले
घरी जाऊन झोपी गेले

 

==============================

'सुट्टीतील धमाल'बद्द्ल मॉनिटर उवाच:

मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी लागली असेल ना किंवा करोनाची साथ असल्याने शहाण्यासारखे तुम्ही घरातच बसून असाल. मग तुम्ही या सुट्टीत काय करताय हे इतरांबरोबर शेअर कराल का? तुम्ही एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा घरबसल्या काही मजेशीर खेळ खेळला असाल, छानसं चित्र काढलं असेल किंवा तुमच्यासोबत करोनामुळे घरातच असणाऱ्या आईबाबा किंवा आजीआजोबांसोबत काहीतरी भारी उपक्रम/खेळ खेळत असाल, एखादा पदार्थ शिकला असाल तर आम्हालाही नक्की सांगा. तुम्ही खेळताय त्या खेळाचा/कृतीचा व्हिडियो आम्हाला पाठवलात तरी चालेल!या सदरात येणारं लेखन हे सुट्टीत मुलांनी घरी बसण्यास प्रोत्साहन म्हणून जसंच्या तसं प्रकाशित केलं जाईल. अर्थात यावर कोणत्याही प्रकारचं संपादन केलेलं नसेल. जे काय कराल ते मात्र घरातच करता येण्याजोगे हवे. या "सुट्टीतील धमाल" नावाच्या सदरामध्ये अश्या गोष्टी सुट्या किंवा एकत्र करून आम्ही प्रकाशित करू. मग त्या तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाचता/बघता येतील!

आम्हाला तुमचं लेखन/कृती पाठवायचा पत्ता आहे - monitor.atakmatak@gmail.com