आपण यांना पाहिलंत का? - भाग १

छोट्या मित्रमैत्रीणींनो,

'आपण यांना पाहिलं का?' या धाग्यावर आपण अनेक जिवांची छायाचित्रे बघणार आहोत. या फोटोंमध्ये दिसणारी मंडळी, तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीदिसण्याची दाट शक्यता आहे, किंवा तुम्ही त्यांना आधी पाहिलेही असेल.

भारतीय शहरांत/गावात सहज दिसणारे पक्षी, प्राणी, कीटक इत्यादी मंडळींचे फोटो इथे तुम्ही बघाल. फोटो बघून तुम्ही ओळखायचं आहे की हा फोटो कोणाचा आहे ते.

तुमचा अंदाज बरोबर आहे का, हे तुम्हाला सोबत असलेल्या ऑडीयो क्लिपवरून कळेलच. शिवाय त्या ऑडीयो क्लिपमध्ये त्या जीवाबद्दल छानशी माहितीही थोडक्यात दिलेली असेल. तर मग आहात सज्ज?

चला तर सांगा.. आपण यांना पाहिलंय का?

 

या भागातील पक्ष्याची छायाचित्रं टिपली आहेत, 'नितीन क्षेमकल्याणी' यांनी.

हा पहिला फोटो.. बघा हा पक्षी ओळखु येतोय का?

 आता हा दुसरा फोटो बघा, त्या पिसांवरील रेषांकडे, डोळ्याच्या रंगाकडे आणि बाकदार चोचीकडे लक्ष असू द्या हं! आला का ओळखु?

 हा पक्षी तुम्ही ओळखला असेल किंवा नसेल, त्याबद्दल ही माहिती ऐकायला तुम्हाला आवडेलच.

उत्तर आणि त्या पक्ष्याच्या माहितीसाठी पुढील चौकटीतल्या 'प्ले' (आडवा त्रिकोण) बटणावर क्लिक करा: