भारतातील नववर्ष (खेळ)

छायाचित्र श्रेय: छायाचित्रात दिसते आहे ती वेद जांभेकर याच्या घरातील गुढी.

आज महाराष्ट्रात गुढीपाडवा आहे. तुम्हा सगळ्यांना या पाडव्याच्या शुभेच्छा! आज तुमच्यपैकी अनेकांकडे गुढ्या उभारल्या जातील, भारीपैकी गोडाचं जेवण असेल, फुल्ल ऑन मज्जा!

इथे (आणि आपल्या काही शेजारी राज्यांत) शालीवाहन शक (म्हणजे कॅलेंडर) पाळलं जातं, त्याचा आज पहिला दिवास! भारतात आज सगळीकडे पाडवा नाही बरं. वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या प्रांतातली लोकं वेगळी कॅलेंडर्स वापरतात, त्यानुसार त्यांचे नववर्ष वेगवेगळ्या दिवशी असतं.

नववर्ष साजरे करणाऱ्या भारतातल्या काही महत्त्वाच्या सणांबद्दल आम्ही एक खेळ तयार केलाय. तो खेळा, त्यातून तुम्हाला नवी माहिती मिळेल. गंमत अशी की तुम्ही दरवेळी खेळलात की त्यात काही प्रश्न वेगळे असतील आणि थोड्यावेळाने तुम्हाला सगळे प्रश्न कळले की हायस्कोर करायला खेळा. खेळ सोप्पा आहे. तुम्हाला माहिती आणि उत्त्तर यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. हा खेळ जितक्या मोठ्या स्क्रीनवर खेळाल तितकी माहिती वाचणं सोपं जाईल बरं. चला तर तय्यार? सगळ्यांना पुन्हा एकदा पाडव्याच्या शुभेच्छा आणि या खेळासाठी ऑल द बेस्ट!  तुमचा स्कोर कमेंट्समध्ये किंवा फेसबूकवर टाकायला विसरू नका!

माहिती स्रोत: फॉरवर्ड म्हणून आलेली माहिती विकिपीडिया व इतर विश्वकोश वापरून खात्री करून मग सदर खेळ बनवला आहे.